ब्रेकिंग
दिव्यात होणार जिल्हा रुग्णालय ,५८ कोटी निधी मंजूर,खासदार. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश… माजी उपमहापौर रमाकांत मढवी
अमित जाधव - संपादक
ठाणे, दि. ३१ राज्याच्या नगर विकास विभागाकडून दिवा येथे जिल्हा रुग्णालय उभारणी करिता ५८ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासाठी विशेष तरतूद या योजनेंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा रुग्णालयाकरिता जागा भुसंपादन करण्याकरिता राज्याच्या नगर विकास विभागाकडून हा निधी देण्यात आला आहे. या रुग्णालयाच्या उभारणीचे काम वेगाने व्हावे यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे नगरविकास विभागाकडे वारंवार पाठपुरावा करत होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्याचे मुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधी करिता मंजुरी दिली आहे.
मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघात अनेक विकासकामे वेगाने मार्गी लागत आहे. मतदार संघातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, जलजीवन मिशनद्वारे ग्रामीण भागातील पाणी प्रश्न मार्गी लावणे, अमृत योजनेद्वारे शहरी तसेच ग्रामीण भागांचा पाणी प्रश्न सोडविणे, मतदार संघातील प्राचीन मंदिरांचा परिसर सुशोभीकरण करणे, भुयारी गटार योजना, नाट्यगृह यांसारखे अनेक विकासकामे लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुराव्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील अनेक सुविधा नव्याने उभ्या राहत आहेत. मतदार संघात पायाभूत सुविधांबरोबरच व्यवस्थेचे बळकटीकरण कशा पद्धतीने होईल यासाठीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे विशेष प्रयत्न करत आहे.