ब्रेकिंग
मनसेच्या महिला शाखाध्यक्ष कु.अंकिता कदम यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना मोफत केरला स्टोरी चित्रपट शोचे आयोजन…..
अमित जाधव - संपादक
मनसेच्या महिला शाखाध्यक्ष कु.अंकिता कदम यांच्या वाढदिवसानिमित्त *द केरला स्टोरी* चित्रपटाच्या मोफत शो चे आयोजन करण्यात आले.
दिवा शहरातील मनसेच्या बेडेकर नगरच्या महिला शाखाध्यक्ष कु.अंकिता कदम यांच्या वाढदिवसानिमित्त बेडेकर मनसे शाखेतर्फे किशोरवयीन मुलींसाठी *द केरला स्टोरी* चित्रपटाचे आयोजन डोंबिवलीतील मधूबन सिनेमागृहात करण्यात आले होते.
यावेळी मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांच्या हस्ते तिकीट वाटून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सोबत विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, देवेंद्र भगत, उपविभाग शैलेंद्र कदम आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.