Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीनोकरीब्रेकिंगराजकिय

ठाणे महापालिका हद्दीतील सर्व आयव्हीएफ व सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्याचे* *महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे निर्देश…

अमित जाधव - संपादक

0 2 5 9 9 3

ठाणे (17) : बदलापूर येथे स्त्रीबीज विक्रीचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असले तरी त्याचे धागेदोरे ठाणे शहरातही आढळून आले आहेत. ठाण्यातील एका प्रख्यात रुग्णालयात विनापरवाना सुरू असलेल्या आयव्हीएफ सेंटर येथे अशाच प्रकारचे गैरप्रकार सुरू असल्याचे समोर आल्यानंतर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या रुग्णालयाची मान्यता तात्काळ रद्द केली असून सोनोग्राफी मशीन सील केल्या आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ठाण्यातील सर्व आयव्हीएफ व सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत

याबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज दालनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीस शिवसेना गटनेते पवन कदम तसेच मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील उपस्थित होते.

गरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना इंजेक्शनद्वारे गर्भात जास्तीची बीज तयार करण्यास भाग पाडले जात होते. त्यानंतर ही बीज काढून लाखो रुपयांना विकली जात होती. मूल नसलेल्या जोडप्यांकडूनही मोठ्या रकमा उकळून हा बेकायदेशीर व्यवहार केला जात असल्याची माहिती डॉ. प्रसाद पाटील यांनी बैठकीत दिली.

दरम्यान, ठाण्यातील प्रख्यात रुग्णालयातील मान्यता नसलेल्या आयव्हीएफ सेंटरवर 6 मार्च रोजी ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईत सेंटरची मान्यता रद्द करण्यात आली असून तेथील तीन सोनोग्राफी मशीन्स सील केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व आयव्हीएफ सेंटरची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच बेकायदेशीर सोनोग्राफी सेंटरविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास नियमितपणे मॉनिटर करून प्रशासनाने दर आठवड्याला अहवाल सादर करावा तसेच आरोग्यविभागाने ज्या पध्दतीने कारवाई केली आहे तशीच कारवाई सातत्याने सुरू ठेवावी असेही निर्देश महापौरांनी दिले आहेत.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 5 9 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे