शपथविधी आटोपतच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा, विनाअनुदानित शाळांच्या जी आर मधील जाचक अटी दूर करण्याची मागणी…
अमित जाधव - संपादक
शपथविधी आटोपतच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा
विनाअनुदानित शाळांच्या जी आर मधील जाचक अटी दूर करण्याची मागणी
ठाणे (प्रतिनिधी) कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधानभवनात शपथविधी आटोपतच लागलीच मंत्रालयात जाऊन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन ६ फेब्रुवारी रोजीच्या जीआर मधील अटी दूर करण्याची मागणी केली. यावर शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन देत अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देत असल्याचे सांगितले यावेळी विनाअनुदानित शाळा कृती समिती कार्याध्यक्ष पुंडलिक राहटे अघोषित शाळा कृती समितीचे भरत जामनिक इत्यादी उपस्थित होते
आज कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना सभापती निलम गोर्हे यांनी पद व गोपीनियतेची शपथ दिली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधीपक्ष नेते अजित पवार आमदार प्रविण दरेकर प्रसाद लाड बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी सभागृहात उपस्थित होते
दि ६ फेब्रुवारी रोजी शासनाने अनुदान मंजूर केल्याचा शासन निर्णय मंजूर केला या जी आर मधील शाळांची तपासणी रद्द करावी तसेच २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता अजून कोणत्याच शाळेला न मिळाल्याने २०१८-१९ ची संचमान्यता ग्राह्य धरून तातडीने अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली यावर शिक्षणमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत असल्याचे सांगितले