मानखुर्द परिसरात मोठ्या प्रमाणावर मटका व इतर जुगार खुलेआम सुरू,त्वरीत कारवाई होन गरजेचं,अन्यथा लवकरच होईल स्थानिकांचा उद्रेक–दीक्षा अर्जुन गायकवाड जळगांव जिल्हा उपाध्यक्ष सोशल मीडिया व आयटी सेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)
अमित जाधव -संपादक
मानखुर्द परिसरात मोठ्या प्रमाणावर मटका व इतर जुगार खुलेआम सुरू,त्वरीत कारवाई होन गरजेचं,अन्यथा लवकरच होईल स्थानिकांचा उद्रेक–दीक्षा अर्जुन गायकवाड
जळगांव जिल्हा उपाध्यक्ष सोशल मीडिया व आयटी सेल
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)
मुबईतील मानखुर्द येथे अवैध धंदे शहरात मोठ्याप्रणावर फैलावत असून त्यात मटका,सट्टा, पत्ते हे जुगार खुलेआम खेळले जात आहेत. अनेक युवापिढी तरुणवर्ग यात अग्रेसर असून अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत या मुळे काही महिलाचा संसार देखील उध्वस्त झाला असून युवा वर्ग मद्य प्राशन करणे,इतर नशेच्या आहारी गेले आहेत.हीच बाब काही सामाजिक कार्यकर्त्यांना समजतात त्यांनी सदर मटका चालक व मालक चंद्रकांत लहाने व हिमांशू मयेकर नामक व्यक्ती हे परिसरात मोठ्या प्रमाणावर मटका व इतर जुगार चालवत असून अनेक युवावर्ग त्या कडे आकर्षित होत आहे अशी तक्रार जवळच्या पोलीसठाण्यात केली असता सदर मटका चालक यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना धमकावत आमचे हफ्ते प्रत्येक पोलीस स्टेशनला पोहचतात असे सांगून पोलीस खात्याची देखील अब्रू काढली व सदर दुकान चालक नारायण बोर्डे देखील असे अवैध व्यवसाय करण्यास सक्रिय असून त्यांच्यावर देखील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व चंद्रकांत लहाने नामक मटका चालक यास काही दिवसांपूर्वी देखील पोलिसांनी अटक केली होती असे काही जवळच्या लोकांनी सांगितले.सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारी वरून मुंबईत किती जुगार अड्डे हे चालवीत आहेत त्यात असे अवैध धंदे चालविण्यात कोण सक्रिय आहे ,यांचे परवाने अनधिकृत रित्या कोण देत आहेत असे अनेक तर्कवितर्क प्रश्न उपस्थित होत आहे यामुळे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत असून असे अनैतिक धंदे परिसरातून हद्दपार करणे अत्यन्त गरजेचे आहे असे काही जैष्ठ नागरिकांनी यावेळी स्पष्ट केलं



