Breaking
ब्रेकिंग

दिव्यात बेडेकर नगर येथे ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य, ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप राऊत आक्रमक…

अमित जाधव - संपादक 9326551040

0 2 0 9 7 4
दिवा -शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील नेतृत्वाखाली  बेडेकर नगर चे उपविभाग प्रमुख संदीप राऊत आक्रमक होत बेडेकर नगर येथे रवीना बिल्डिंग, साई सृष्टी चाळ , जय भोले चाळ , साईबाबा चाळ ,खरवली देवी चाळ,येथे भरपूर प्रमाणात कचरा जमा झाला आहे आणि सांडपाणी साचून राहिल्या मुळे तेथील नागरिकांना त्रास होत आहे तसेच लहान मुल देखील आजाराचे बळी पडू शकतात येथे दिवा प्रभाग समिती अंतर्गत अद्याप साफसफाई सुरु नसून हा विभाग पूर्ण पणे दुर्लक्षित आहे त्यामुळे येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आहे असे उपविभाग प्रमुख संदीप राऊत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केल आहे
दिवा प्रभाग समितीने लवकरात लवकर येथील समस्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे