ठाण्यात श्रीनगर पोलीस स्टेशन मध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता भीमराव व्हावळ वय ३४ ह्यांनी गळफास लावून आत्महत्या केली…
अमित जाधव-संपादक
ठाणे श्रीनगर पोलीस स्टेशन मध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता भीमराव व्हावळ वय ३४ ह्यांनी गळफास लावून आत्महत्या केली।
#ठाणे:- श्रीनगर पोलीस स्टेशन (ठाणे पोलीस आयुक्तालय) निवडणुकी वरील महिला पोलीस नाईक अनिता भीमराव वाव्हळ (७५७६) या मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी साडेदहा वाजता नेहमीप्रमाणे कर्तव्यावर हजर झाल्या .
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार त्यांना फोन करत होत्या. परंतु त्या फोन उचलत नव्हत्या .
म्हणून त्यांनी महिला कक्षात जाऊन प्रत्यक्ष पाहिले असता, महिला पोलीस नाईक अनिता वावळ यांनी ओढणीने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी प्रेस नोट मध्ये घरगुती कारणास्तव आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे .असे म्हटले आहे .ही बाब तात्काळ वरिष्ठना कशी समजली ?. काहीतरी काळेभिरे असण्याची शक्यता आहे.व ही आत्महत्या संशयास्पद आहे.? बातमीला कोणताही दुजोरा न देताच श्रीनगर पोलीस ठाणेच्या अधिकाऱ्यांनीआपली बाजू झटकण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय.!
या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. जयजित सिंग यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, अप्पर पोलीस आयुक्तांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली।