Breaking
ब्रेकिंग

बेकायदेशीर शस्त्र विक्रीसाठी आलेल्या इसमाला मोठ्या शिताफीने मुंब्रा पोलिसांनी केली अटक…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

मुंब्रा,ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये बेकायदेशीर शस्त्र व दारूगोळा बाळगणारे, खरेदी विक्री करणारे इसमांवर विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याबाबत मा. पोलीस आयुक्त साो, मा. पोलीस सह आयुक्त साो, ठाणे शहर व अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे शहर यांनी आदेशीत केले असताना आज अग्नीशस्त्रे व दारूगोळा बाळगणारे, खरेदी विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, मुंब्रा पोलीस स्टेशन यांनी सुचना दिलेल्या आहेत.

दिनांक ११/०१/२०२४ रोजी मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुंभार यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने तपासपथकाने मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळील एम.गेट परिसरात सापळा लावुन दिनांक ११/०१/२०२४ रोजी २३:४५ वा. बिहार चा स्थानिक राकेश सत्येंद्रकुमार मेहता, वय-१९ वर्षे सध्या राहणार- सोनारपाडा, डोंबीवली यास ताब्यात घेतले. त्याचे अंगझडतीत पॅन्टच्या आतमध्ये लपविलेले एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व सहा चेंबरचे रिव्हॉल्वर मिळुन आले तसेच त्याचे पॅटच्या खिशामध्ये देशी बनावटीचे दोन अग्नीशस्त्र व तीन जिवंत काडतुसे असा ६५,६०० रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असुन मुंब्रा पोलीस ठाणे अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदर कारवाई डॉ. महेश पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर, श्री गणेश गावडे पोलीस उप. आयुक्त, परि-१ ठाणे, श्री. विजयसिंह भोसले सहाय्यक पोलीस आयुक्त, कळवा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक – निवृत्ती कोल्हटकर, सपोनि अजय कुंभार, सपोउपनिरी दिपक जाधव, पोलीस अंमलदार अजिज तडवी, सतिश खाबडे, तेजस परब, रोशन कदम, कृष्णा आव्हाड यांनी केलेली असुन पुढील तपास सपोनि अजय कुंभार करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे