दिवा आगासन रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा अन्यथा उग्र आंदोलनचां इशारा विभाग प्रमुख नागेश पवार यांचे दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त यांना निवेदन…
अमित जाधव - संपादक
दिवा:- दिवाआगासन रस्ता दिव्यातील प्रमुख रस्ता असून सदर रस्त्याला 65 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत या रस्त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आम्ही वारंवार केलेला आहे सदर रस्त्याला अनेक ठिकाणी भेगाही पडले आहेत. त्यातच अनेक वेळा जलवाहिनी फुटल्यामुळे हा प्रमुख रस्ता आगासन रेल्वे फाटक जवळ, विकास म्हात्रे गेट, गणेश नगर अशा अनेक ठिकाणी खोदण्यात आलेला होता परंतु पाणी लिकेजचे संपूर्ण काम झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग यांनी या खोदलेल्या रस्त्याची डाग डुगीकरण केलेले नाही गणेशोत्सव जवळ येत असून गणपती बाप्पाचे लवकरात लवकर आता आगमन होणार आहे तरी या आगमनाच्या अगोदर हे रस्ते दुरुस्त झाले पाहिजे आपण तातडीने पाणीपुरवठा विभागाला आपल्या मार्फत आदेश देऊन ह्या रस्त्यावरील डागडूजी करून कॉंक्रिटीकरण करण्यात यावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून या संदर्भात आंदोलन घेण्यात येईल असे विभाग प्रमुख नागेश पवार यांनी म्हटले आहे यावेळी सहाय्यक अक्षय गुडदे यांना पत्र देताना विभाग प्रमुख नागेश पवार ,शहर संघटिका ज्योती पाटील ,उपविभाग प्रमुख योगेश निकम, उपविभाग प्रमुख संदीप राऊत आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.