दिवा डंपिंग ग्राउंड प्रकरण – ठाणे महापालिकेवर १० कोटींचा दंड ही जनतेच्या लढ्याला मिळालेली मोठी विजय – रोहिदास मुंडे
अमित जाधव - संपादक

दिवा प्रभागातील डंपिंग ग्राउंडमध्ये गेल्या सात वर्षांपासून (२०१६ ते २०२३) ठाणे महापालिकेकडून सातत्याने बेकायदेशीर कचरा टाकण्यात येत होता. या प्रकारामुळे परिसरातील खारफुटीचे जैवविविधतेचे मोठे नुकसान, दुर्गंधी, लीचेट्समुळे भूजल प्रदूषण, आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला. या गंभीर प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) ठाणे महापालिकेला तब्बल ₹१०.२ कोटींचा दंड ठोठावला आहे.
ही कारवाई म्हणजे दिवा परिसरातील जनतेचा संघर्ष आणि वनशक्ती फाउंडेशनचे संस्थापक स्टॅलिन दयानंद या सारख्या पर्यावरण प्रेमी संस्थांचा विजय आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या लढ्याशी एकात्म आहे. आम्ही सुरुवातीपासूनच या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आलो असून, आजची ही कारवाई म्हणजे जनतेच्या आवाजाची दखल घेतली गेली, हे स्पष्ट आहे.
या संपूर्ण प्रकरणात टीएमसीने केवळ पर्यावरणाची नव्हे, तर नागरिकांच्या मूलभूत हक्कांचीही पायमल्ली केली आहे. त्यामुळे आम्ही पुढील बाबींची ठामपणे मागणी करतो:
डंपिंग ग्राउंड परिसरातील सर्व बेकायदेशीर कचरा त्वरित साफ करण्यात यावा.
प्रदूषित भूजल व परिसराचे वैज्ञानिक पुनर्वसन केले जावे.
आरोग्यधोका निर्माण झालेल्या परिसरातील नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिरे लावावीत.
दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही केली जावी.
भविष्यात अशा प्रकारचा पर्यावरणविनाश टाळण्यासाठी पारदर्शक आणि जनतेच्या सल्ल्याने धोरण आखावे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा नेहमीच पर्यावरण रक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि प्रशासनाची जबाबदारी या मुद्यांवर प्रामाणिकपणे काम करत आला आहे. यापुढेही आम्ही दिवा व परिसरातील जनतेच्या प्रत्येक संघर्षात त्यांच्या सोबत आहोत. असे कल्याण कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे