ठाण्यात एस्.आर्.ए व क्लस्टर सारखे प्रकल्प येऊनही “झोपडपट्टी मुक्त ठाणे” अजूनही होत नसून याला पूर्णता ठाणे महापालिका प्रशासन व अनेक वर्षांपासून सत्तेत असलेला सत्ताधारी पक्ष-ठाणे काँग्रेस….
अमित जाधव-संपादक
.
*ठाणे:ठाण्यात एस्.आर्.ए व क्लस्टर सारखे प्रकल्प येऊनही “झोपडपट्टी मुक्त ठाणे” अजूनही होत नसून याला पूर्णता ठाणे महापालिका प्रशासन व अनेक वर्षांपासून सत्तेत असलेला सत्ताधारी पक्ष जवाबदार असल्याचा आरोप ठाणे शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी आज केला.*
ठाणे शहर(जिल्हा)काॅग्रेसच्या वतीने मागील आठवड्यापासून ठाणे महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समिती बाहेर जनआंदोलन घेडण्यात आले असून आज उथळसर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर शहर काॅग्रेस ब्लाॅकअध्यक्ष संदिप शिंदे यांच्या माध्यमातून अपूर्ण नालेसफाई,अनधिकृत बांधकामावर कारवाई करिता जनआंदोलन करण्यात आले याप्रसंगी शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी बोलतांना सांगितले की,प्रत्येक वर्षी चुकीच्या पद्धतीच्या नालेसफाई बाबत जनता आवाज उचलत आहे सध्या चालू असलेल्या चुकीच्या नालेसफाईमुळे यावेळेसही ठाण्यातील विविध भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होणार आहे,ठाणे महापालिका अधिकारी वर्ग नालेसफाई व इतरही कामाची वस्तुस्थिती आयुक्तांसमोर येउ देत नाही अनधिकृत बांधकामावर थातुर मातुर कारवाईचा फक्त फार्स करण्यात येत असून कोणतेही बांधकाम समूळ नष्ट करण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला,मागील पूर्ण आठवडा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रत्येक प्रभाग समिती समोर आदोलन घेडत असून या आंदोलनाची सांगता येत्या 14 तारखेला ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करून करण्यात येणार असल्याचे अॅड.विक्रांत चव्हाण यांनी शेवटी बोलताना सांगितले.


