दिव्यातील म्हातार्डी गाव येथे म्हार्तंडेश्वर क्रिकेट क्लब च्या वतीने भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन,सोनारपाडा गावातील आर. एम.इलेव्हण संघ ने अखेर फायनल जिंकली……
अमित जाधव - संपादक
दिव्यातील म्हातार्डी गाव येथे म्हार्तंडेश्वर क्रिकेट क्लब च्या वतीने भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन….
सोनारपाडा गावातील आर. एम.इलेव्हण संघ ने अखेर फायनल जिंकली……
लाखोंच्या पारितोषिकाचा वर्षाव….
दिवा शहरातील म्हातार्डी गाव येथे पाण्याची टाकी असलेल्या खुल्या मैदानावर ओम् म्हार्तंडेश्वर क्रिकेट क्लब संयोजीत श्री.वैष्णव नवनीत पाटील (शिवसेना दिवा शहर उपशहर प्रमुख)यांच्या वतीने आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा यंदा भरविण्यात आल्या.क्रिकेट स्पर्धेत मोठ्याप्रमाणावर पारितोषिकांची खेळाडूवर बरसात करण्यात आली.प्रथम विजेत्या संघास रोख एक लाख रक्कम व भव्य असा चषक देण्यात आला.द्वितीय संघास रोख ५१,००० रू. व चषक आणि तिसऱ्या नंबर वर असणाऱ्या संघास २५,००० रोख व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.सदर स्पर्धा अनेक मान्यवरांनी हजेरी लावून आपली उपस्थिती दर्शविली सुमित सुभाष भोईर,प्रवीण उतेकर,रमेश शिंदे, शकर म्हात्रे,भगवान पाटील,विजय पाटील,महेश पाटील(संगर्ली, डाँबवली)हेमंत नाईक (दातीवली),आदी मान्यवर हजर होते.
प्रथम क्रमांक गाव देवी आर एस इलेव्हन(सोनार पाडा), व्दितीय क्रमांक सोनू मोनु जी जी स्पोर्ट्स (वाकलन) यां विजयी संघाला पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
बेस्ट फलंदाज दत्ता ठाकूर (५० धावा),उत्कृष्ट गोलंदाज उन्मेष भोईर(६ बाद),उत्कृष्ट खेळाडू म्हणून अनिकेत पाटील(सोनार पाडा),तीन दिवसीय क्रिकेट मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेला जित भोईर (वाकलन)७२ धावा व चार विकेट घेत क्रिकेटचा हिरो ठरला.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजय पाटील,मिथुन पाटील,आशिष पाटील,सिद्धांत पाटील ,राज पाटील,राज शेलार,उमेश पाटील,बाबू शेलार,वैभव पाटील,गोवर्धन पाटील,शंकर म्हात्रे,गोपाळ जंगम व इतर पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले असे कार्यक्रमाचे प्रमुख श्री.नवनीत पाटील यांनी सांगितलं.



