सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबवलीत सामूहिक बलात्कार,15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी केले अमानुष अत्याचार……
अमित जाधव-संपादक
- ठाणे : डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपर परिसरात एका 15 वर्षी अल्पवयीन मुलीवर 33 नराधमांनी अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 33 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यत 23 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीमध्ये २ अल्पवयीन असल्याचे समोर आले असून अद्यापही 10 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
15 वर्षीय पीडित मुलगी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. २२ जानेवारी २०२१ तिच्या प्रियकराने तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी त्याने अत्याचार करतानाचा मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते. तेव्हापासूनच तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन डोंबिवली, बदलापूर, मुरबाड व रबाळे या परिसरात आरोपींनी २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत म्हणजे ९ महिन्यापर्यत तिच्यावर वारंवार बळजबरीने अत्याचार केला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास भादवि ३७६, ३७६ (एन), ३७६ (३) ३७६ (ड) (अ) सह पोक्सो कायदा कलम ४, ६१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
कल्याण पोलीस परीमंडळ ३ मधील इतर पोलीस ठाणे तसेच मानपाडा पोलीस ठाण्यातील ४ पोलीस पथकांनी स्थापन गुन्हयातील आरोपीचे नाव व राहण्याचे ठिकाण शोधून काढले. आतापर्यत २३ आरोपीला ४ तासात ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून अटक करण्यात आली आहे. २३ जणांपैकी २ बालकांचाही गुन्हयात सहभाग असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील उर्वरीत १० आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींना अटक करण्याचे आम्ही प्रयत्न करत असल्याचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, यांनी सांगितले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन आणि सोनाली ढोले करत आहेत.