मानव विकास संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री मा.विजयजी कुराडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमाची रेलचेल….
अमित जाधव-संपादक
*मानव विकास संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री विजयजी कुराडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. 18.10.2022 रोजी शासकीय विश्राम गृह, ठाणे येथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात *मानव विकास संरक्षण समिती, नवी दिल्लीच्या राष्ट्रीय महिला जनसंपर्क प्रमुख डॉ. शुभांगी ताई रत्नपारखी मॅडम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून मानव विकास संरक्षण समिती, गोवा राज्य महिला अध्यक्षा सौ. खतिजा खान मॅडम यांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमासाठी पालघर, वाडा,कल्याण, दिवा, कळवा,ठाणे, मुंबई व उपनगरातून अनेक महिला व पुरुष पदाधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व प्रथम मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. त्यानंतर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेजा राजा, छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न, प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पाहुण्यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचे निवेदन श्री प्रवीण गायकवाड यांनी तर प्रास्ताविक श्री रविदास बाविस्कर यांनी केले. नंतर उपस्थितांमध्ये नवीन नियुक्त्या व समितीचे ओळखपत्र वितरण करण्यात आले. यानंतर श्री प्रवीण गायकवाड व श्री रविदास बाविस्कर यांनी समिती विषयी माहिती दिली. डॉ. शुभांगी ताई रत्नपारखी मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समिती कशाप्रकारे काम करत आहे, आणि अजून बराच बदल व नियुक्त्या यामध्ये करायच्या आहेत, त्यानुसार वाटचाल सुरु आहे, म्हणून सर्वांनी आपल्या कामावर लक्ष देऊन गरजूंची मदत करून *मानव विकास संरक्षण समितीचे* नाव कशाप्रकारे गावागावात पोहचेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. तसेच व्यवसायाने त्या डॉक्टर असल्यामुळे कुणालाही वैद्यकीय समस्या असतील तर माझ्याशी संपर्क करा असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. यानंतर *श्री रविदास बाविस्कर* यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व आजचा कार्यक्रम संपन्न झाला अशी घोषणा केली, तत्पूर्वी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यानंतर मानव विकास संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री विजयजी कुराडे साहेब यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
🏵️