ठाण्यातील काँग्रेस नेते सचिन शिंदेंचे निधन
ठाणे – काँग्रेस नेते सचिन शिंदेंचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबासह कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेस पक्षाचे आंदोलन असो किंवा मेळावा त्यांचा सक्रीय सहभाग होता. ते ठाणे जिल्हा काँग्रेस प्रवक्ते होते. स्थानिक प्रश्नांवरुन ते विरोधकांना घेरण्याचे काम करत होते. त्यांच्यावर आज ठाण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.