Breaking
ब्रेकिंग

महिला आयोग आपल्या दारी’ मंगळवारी ठाणे जिल्ह्यात महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या – रुपाली चाकणकर यांचे आवाहन…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दि. १९ (प्रतिनिधि) :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी मंगळवार दि. 23 मे 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट नाका, ठाणे येथे सकाळी 10.30 वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर आणि आयोगाच्या सदस्या या स्वत: तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर दि. 23 मे रोजी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत जनसुनावणी होणार आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक होईल. यावेळी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच आरोग्य, परिवहन, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. जिल्हा दौरा दरम्यान वन स्टॉप सेंटर तसेच महिला वसतीगृहास ही आयोगाच्या अध्यक्षा व सदस्या भेट देणार आहेत.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होतो. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग याद्वारे करत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे