
मुलींकडून वाईट वागणूक; फौजीने दान केली करोडोंची संपत्ती
एका निवृत्त सैनिकाने आयुष्यभर कष्ट करुन करोडोंची संपत्ती उभी केली. पण वारसाहक्कासाठी मुलींकडून फौजीला अपमानास्पद वागणूक मिळत होती. शिवाय पत्नीही वेगळी राहत आहे. मग काय, फौजीने तब्बल 4 कोटींची संपत्ती थेट मंदिरालाच दान केली. तामिळनाडूतील तिरुवन्नमलई जिल्ह्यात राहणारे एस विजयन यांनी संपत्तीची कागदपत्रे दानपेटीत टाकली. कुटुंबियांनी मंदिर प्रशासनाकडे कागदपत्रे मागितली पण मंदिराने देण्यास नकार दिला.