दिवा शिळ रस्त्यावरील खर्डी पुल धोकादायक,त्वरित दुरुस्ती करा – शरद पाटील ,मनसे..
अमित जाधव - संपादक
शिळ रस्त्यावरील खर्डी पुल धोकादायक,त्वरित दुरुस्ती करा – शरद पाटील ,मनसे..
दिवा – ठाणे महापालिका हद्दीतील शिळ दिवा रस्ता बनवताना दिव्याला जाण्यासाठी एकमेव रस्ता खार्डी खाडीतुन सूचवण्यात आले ते करत असताना अनेक समस्या निर्माण झाल्या.पन PWD च्या सहकार्याने २००० साली खार्डी पुलाचे काम चालु झाले .२००४ साली या पुलाचे काम पुर्ण होऊन दिवा परिसरातील लोकांना व शिळ खार्डी तसेच अनेक गांवाना या पुलाचा मोठ्या प्रमाणावर ये जा करण्यासाठी अत्यंत फायदा झाला.PWD नंतर हा रस्ता ठाणे महापालिकेला हस्तांतरित करण्यात आले. आज या पुलावरुन लाखों लोक ये जा करत आहेत,पन आज त्या पुलाची दुरावस्था झाली असुन कुठल्याही प्रकारची पुलाची अधिकाऱ्या कडुन पहानी व रंगरंगोटी करण्यात आली नाही,आज तो पुल लोखंडाच्या सहाऱ्यावर उभा असणाऱ्या लोखंडाला जंग लागुन लोखंडाचे खांब कमकुंवत झाले आहेत व तो पुल धोकादायक झाला आहे. त्या मुले मोठी दुर्घटना होऊ शकते , दुर्घटना होऊ नये या करीता आपन त्वरीत या पुलाची पहानी करुन पर्याई मार्ग काढावा.व त्या पुलाची दुरुस्ती देखिल करावी. दुर्घटना घडल्यास या कोण जिम्मेदार असणार असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खर्डी गावचे शरद पाटील यांनी निवेदनाद्वारे महापालिकेस कळविले आहे



