Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाणे परिवहन सेवेतील कळवा आणि वागळे आगार येथील स्क्रॅप गाडयांना लावले डमी टायर,मोठा घोटाळा उघड…

0 2 0 9 7 4

*ठाणे परिवहन सेवेतील कळवा आणि वागळे आगार येथील स्क्रॅप गाडयांना लावले डमी टायर*

ठाणे :- परिवहन समितीचे सदस्य प्रकाश पाटील यांनी ठाणे परिवहनचे अधिकारी नितीन सोनटक्के यांच्यावर स्क्रॅप गाडयांना डमी टायर लावल्याची गंभीर आरोप केला आहे. या बाबत माहिती देताना ते म्हणाले परिवहन सेवेतील 153 बसेस या स्क्रॅप मध्ये निघाल्या होत्या आणि त्याचे टेंडर मे युनिव्हर्सल स्क्रॅप ट्रेडर्स यांनी जास्त दराने भरल्या मुळे प्रशासनाने त्यांना ह्या स्क्रॅपचे टेंडर दिले, या मध्ये एका बसची किंमत 3,80,000/- रुपये इतकी निश्चित करण्यात आली, एकूण 153 बसेस करिता लिलावाची किंमत 5 करोड 81 लाख रुपये इतकी झाली, ट्रेडर्स कंपनीने 10% पैसे भरले परंतु बाकी रक्कम भरण्यास ते असमर्थ ठरले, परिवहन व्यवस्थापक यांनी त्यास 30 दिवसाची मुदतवाढ दिली ती बेकायदेशीर होती.
या रकमेची G.S.T भरण्याची तारीख 30 एप्रिल 2022 असताना, परिवहन व्यवस्थापक यांनी त्यांना मुदतवाढ दिली व त्यांनी ती 12/5/2022 रोजी भरली, परंतु व्यवस्थापक यांनी 6/5/2022 रोजीच वर्कऑर्डर दिली, या मध्ये एम एस टी सी एल यांचा 18% GST घेतला, परंतु महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा 18% GST त्यांनी का घेतला नाही या मागे प्रशासनाचा काय हेतू होता? या बाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे, तसेच कळवा आणि वागळे आगार मध्ये दिनांक 4/5/2022 ते दिनांक 13/5/2022 पर्यंत श्री नितीन सोनटक्के कार्यशाळा व्यवस्थापक यांच्या आदेशान्वये श्री सारंग सहाय्यक अधीक्षक यांनी निकामी बसेस ना डमी टायर बसविले , विशेष म्हणजे या निकामी बसेस ना डमी टायर बसविण्याचे आदेश एक महिन्यापूर्वीच नितीन सोनटक्के यांनी दिले असे कळवा आणि वागळे आगारातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे परंतु असे आदेश देण्याचे त्यांना कोणतेही अधिकार नाहीत,या सर्व बाबींची चौकशी व्हावी अशी तक्रार प्रकाश पाटील यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्या कडे केली आहे, तसेच संबंधित पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा तक्रार दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे