दिवा-रोहा ट्रेन 8.45 ही गाडी फाटा तुटला,प्रवासी बसले खोळंम्बत,गाडी रद्द,दिवा रेल्वेप्रवासी संघटनेचे अद्यक्ष.ऍड आदेश भगत आले धावून…..
अमित जाधव-संपादक
दिवा-रोहा ट्रेन 8.45 ही गाडी फाटा तुटला आहे म्हणून रद्द करण्यात येत आहे सकाळी 8.15 पासून प्रवासी स्थानकात खोळंबले ब्रेक तुटला होता तर गाडी चेक करून पाठवत नाहीत का किंवा दिवा स्थानकात गाडी 1 तास अगोदर येते, मग त्या दरम्यान गाडी चेक का केली जात नाही.?असे प्रश्न करत दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मा. आदेश भगत यांनी रेल्वे स्टेशन मास्टर व अधिकाऱ्यांना धारेवर धरले व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मदतीने खोळंम्बत बसलेल्या प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत करण्यास दिवा रेल्वे कर्मचारी यांना बजावले
आता दोन – अडीच तास बसलेल्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था म्हणून कळवा कारशेड मधून पर्यायी गाडी येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.सदर गाडी अजूनही आलेली नाही सदर पर्यायी गाडी कल्याण स्थानकात जाऊन पुन्हा दिव्याला येणार असल्याचे बोलले जाते
दिवा रोहा गाडीत झालेल्या बिघाडामुळे खोळंबलेल्या प्रवाशांनी आपल्या तिकिटाचे पैसे परत मागण्यासाठी गेले असता त्यांना नकार देण्यात आला.
त्यानंतर रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांच्या कार्यालयाशी बोलणं केल्या नंतर व स्थानिक स्टेशन मास्तर यांना जाब विचारल्या नंतर तिकिटाचे पैसे परत देण्यास सुरुवात केली आहे सर्व प्रवाशांना पैसे परत देऊन दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे ऍड.आदेश भगत व सहकार्याचे प्रवासीयांनी आभार मानले