Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मुलाचा नरबळी देणाऱ्या भोंदुबाबाला ठाण्यात अटक,युट्युबवर तंत्रमंत्र विद्येचे विडीओ प्रसारीत करुन अनेकांना घातला गंडा….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

मुलाचा नरबळी देणाऱ्या भोंदुबाबाला ठाण्यात अटक,युट्युबवर तंत्रमंत्र विद्येचे विडीओ प्रसारीत करुन अनेकांना घातला गंडा

ठाणे (प्रतिनिधी ) भूतप्रेतांचा शोध घेवून तंत्रमंत्राद्वारे त्यातून मुक्ती मिळवून देतो असे विडीओ बनवून ते युट्युबवरुन प्रसारित करुन लोकांना गंडा घालणाऱ्या भोंदुबाबाला त्याच्या साथीदारांसह गजाआड केले.याबाबाने एका अल्पवयीन मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
कुलदिप प्रदिप निकम ( पोखरण रोड,वर्तकनगर ठाणे) असे या भोंदुबाबाचे नाव असून त्याचे साथीदार किशोर देविदास नवले (विक्रोळी),स्नेहा नाथा शिंदे (वर्तकनगर ठाणे) यांनाही अटक करण्याची मागणी पोलीसांनी दिली.या घटनेतील मुख्य आरोपी प्रदिप निकम याने त्याच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलीचा शारिरीक छळ करुन त्याचा नरबळी देण्याचा प्रयत्न सुरु केला.या प्रकरणी चितळसर पोलीसांत 13 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष आणि अनिष्ट आणि अघोरी कृत्यांचा प्रतिबंध तसेच बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हात पोलीसांनी मुख्य आरोपी कुलदिप प्रदिप निकम याच्यासह त्याचे साथिदार किशोर देविदास नवले,स्नेहा नाथा शिंदे यांना 13 व 14 मार्च रोजी अटक केली.त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कुलदिप निकम याने भोंदुगिरीच्या कामासाठी दत्त प्रबोधिनी नावाची संस्था स्थापन केली होती.त्याचप्रमाणे तो पँरानाँर्मल रेस्क्युअर सोसायटी नावाने युट्युब चँनेलदेखील चालवायचा.पोलीसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता,सापाचे कातडे,घोस्ट डिटेक्टर(भुत शोधण्याचे मशिन) महागडे लॅपटाँप,नाईट व्हिजन सीसीटिव्ही कॅमेरे,तंत्रमंत्र विद्येची पुस्तके,त्रिशुळ,होमहवन करण्याचे साहित्य,पैसे मोजण्याचे मशिन असे साहित्य सापडले.

कुलदिप नकमचा साथिदार किशोर देविदास नवले याच्या घराची पोलीसांनी झडती घेतली असता त्यावेळी त्याच्या घरात दोन वाघांचे कातडे,हॅलोजन लाईट,काळ्या बाहुल्या,कावळ्यांचे पंख असे साहित्य सापडले.या भोंदुबाबांनी भुतबाधा उतरवून देतो असे सांगुन तथाकथित भुतप्रेत उतरविण्याचा विडीओ युट्युबवर प्रसारित करुन अनेक लोकांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.निकम नवले यांच्यासह स्नेहा शिंदे या तिघांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे