ब्रेकिंग
दिव्यात AC च्या शॉकसर्किट ने लागलेल्या आगीत घरातील सीलिंग व फर्निचर जळून खाक..
अमित जाधव - संपादक
दिनांक ०९/०५/२०२४ रोजी १९:५८ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती देणारे: बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष)
दिवा आगासन रोड, गणेश नगर, दिवा या ठिकाणी चिन्मय अपार्टमेंट मधील (तळ+०८ मजली इमारत) या इमारतीच्या आठव्या मजल्यावरतील रूम क्रमांक – ८०१ या रूम मध्ये एसीला आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहन व १ रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते.सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदर रूम मधील एसीला आग लागल्याने एसीचे, घरातील सिलिंग व फर्निचर साहित्याचे जळून नुकसान झाले आहे. सदर रूम बंद होती.
सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांनी २०:५० वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविली होती.परिस्थिती नियंत्रणात आहे.