Breaking
ब्रेकिंग

कल्याण कोलशेवाडी पोलिसांची कौतुकास्पद कामगीरी,चाकूचा धाक दाखवत हॉटेल मालकाला धमकावणाऱ्या गुंडाला पोलिसांनी दिला चोप….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

हॉटेल मालकाला धमकावणाऱ्या गुंडाला पोलिसांनी दिला चोप

कल्याण – जेवणासाठी हॉटेल मालकाला चाकू दाखवणाऱ्या आरोपीला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी भर चौकात चोप देत चांगलेच बदडले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

कल्याण सूचक नाका परिसरात आलिया दरबार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये 25 तारखेला सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान या परिसरातील बाबू नसीम शेख उर्फ बाबू जंगली नावाच्या गुन्हेगारांनी मोफत जेवण घेण्यासाठी हॉटेल मालकाला चाकूचा धाक दाखवत हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात धिंगाणा घातला.

हॉटेल चालकांनी या गुन्हेगारांचा काटा काढण्यासाठी युक्तीचा उपयोग करत या गुन्हेगारांना मोफत जेवण दिले. आरोपी चाकू दाखवून धमकावत असल्याचे पोलिसांना सांगितले. व्यापाऱ्याची तक्रार येताच कोळसवाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या आरोपाची चौकशी केली.

आरोपीकडून धारदार हत्यार पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपीला धडा शिकवण्यासाठी आणि परिसरात या आरोपीची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी हॉटेल बाहेरच या आरोपीची चांगलीच धुलाई केली. वारंवार पोलिसात तक्रार देऊन फक्त दिखावाची कारवाई पोलिसांकडून होत आहे. प्रत्येक वेळी हा आरोपी दोन दिवसात सुटून येऊन पुन्हा परिसरात दहशत माजवत असल्याने परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे. सध्या पोलिसांनी या आरोपीवर हत्यार बाळगण्याचा गुन्हा दाखल करत आपला तपास सुरू केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे