बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

रविवार दिनांक ३०.०६.२०२४ रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेगा ब्लॉक,

अमित जाधव - संपादक

मध्य रेल्वे
प्रसिद्धी पत्रक

*रविवार दिनांक ३०.०६.२०२४ रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेगा ब्लॉक*

मध्य रेल्वे, मुंबई विभाग खालीलप्रमाणे रविवार दि. ३०.०६.२०२४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे:

*ठाणे ते कल्याण दरम्यान पाचवी आणि सहावी लाईन सकाळी ०९.०० ते दुपारी १.००*

*अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे वळण*

पुढील अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि गंतव्यस्थानावर १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
• गाडी क्रमांक 11010 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 17611 नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 12124 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन
• ट्रेन क्रमांक 12134 मंगळुरु -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 13201 पाटणा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 17221 काकीनाडा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 12126 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 22160 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 12168 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 12321 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल
• ट्रेन क्रमांक 12812 हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 11014 कोइम्बत्तूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

*डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्शन*

खालील डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.
• ट्रेन क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कोल्हापूर एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्सप्रेस
• ट्रेन क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस

*मेमू सेवा स्थगित*

• मेमू क्रमांक 01339 वसई रोड- दिवा सकाळी ०९.५० वाजता वसई रोडवरून कोपरपर्यंत असेल आणि कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान रद्द राहील.
• मेमू क्रमांक 01340 कोपर येथून सकाळी ११.४५ वाजता सुटेल आणि वसई रोड येथे दुपारी १२.३० वाजता पोहोचेल आणि दिवा आणि कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.

*पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर (पोर्ट लाईन वगळून) सकाळी ११.०५ ते सायंकाळी ०४.०५ पर्यंत*

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि
ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

*डाउन हार्बर मार्गावर:*
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि १०.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.१६ वाजता सुटेल आणि ४.३६ वाजता पनवेल येथे पोहोचेल.

*अप हार्बर मार्गावर:*
ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.१७ वाजता सुटेल आणि ११.३६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल पनवेल येथून ४.१० वाजता सुटेल आणि ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

*डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर:*
ब्लॉकपूर्वी पनवेल येथे जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी ९.३९ वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी १०.३१ वाजता पोहोचेल.
ब्लॉकनंतर पनवेल येथे जाणारी पहिली लोकल ठाणे येथून दुपारी ४.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुपारी ४.५२ वाजता पोहोचेल.

*अप ट्रान्स-हार्बर मार्गावर:*
ब्लॉकपूर्वी ठाणे येथे जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.४१ वाजता सुटेल आणि ठाणे येथे ११.३३ वाजता पोहोचेल.
ब्लॉकनंतर ठाणे येथे जाणारी पहिली लोकल पनवेल येथून ४.२६ वाजता सुटेल आणि ठाणे येथे ५.२० वाजता पोहोचेल.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागावर विशेष लोकल चालतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.

सदर मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

दिनांक: २८ जून २०२४
प्रप क्रमांक: २०२४/०६/३४
सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांनी जारी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे