Breaking
ब्रेकिंग

मुब्र्यात अल्पवयीन मुलाची संशयावरून निर्घृण हत्या,12 तासाच्या आत आरोपीला अटक, मुब्रा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

संशयावरून एका २० वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या

ठाणे : तीन वर्षांपूर्वी लहान भावाच्या झालेल्या खुनात सहभाग असल्याच्या संशयावरून एका २० वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंब्रा येथे घडली आहे. काल सोमवारी मुंब्रा येथील पाणेरीपाडा येथे एका तरुणाचा मृतदेह गळा चिरून हात आणि पायाच्या नस कापलेल्या अवस्थेत झुडपात टाकलेला आढळून आला होता. या प्रकरणी कुठलेही पुरावे पोलिसांकडे नसल्याने पोलिसांनी अज्ञात इसमांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने मोठ्या शिताफीने मुंब्रा पोलिसांना २६ वर्षीय आरोपीला १२ तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद इत्तेहाद मोहम्मद अब्दुल वाहीद असे २० वर्षीय मृतकाचे नाव असून सानीफ आसु साही असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हे दोघेही मुळचे पश्चिम बंगाल येथील रहिवाशी आहेत. तसेच या प्रकरणातील एका फरार आरोपीचा शोध मुंब्रा पोलीस घेत आहेत. सानीफ याची मुंब्रा पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली. ३ वर्षांपूर्वी आरोपी सानीफ याचा लहान भाऊ अलकरीम याची मूळ गावी पश्चिम बंगाल येथे हत्या झाली होती. आपल्या भावाची हत्या मयत मोहम्मद इत्तेहाद याने आपल्या ७ साथीदारांच्या मदतीने केल्याच्या संशयातून सानीफ याने आपला साथीदार झाकीर शेख याच्या मदतीने मोहम्मद इत्तेहाद याची गळा चिरून हत्या केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे