दिवा शहरातील गणेश पाड्यातील रणरागिणी पुन्हा निवडणुकीत बाजी मारणार…
अमित जाधव - संपादक

ठाणे ता ९ जाने : ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूकित २०१७ मध्ये शिवसेनेतून प्रचंड बहुमताने निवडून आल्यावर माजी नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे यांनी आपल्या प्रभागात अनेक विकास कामे केली. येत्या ठाणे महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या प्रभाग क्रं. २८ मधून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून आपल्या प्रभागात त्याचच्या प्राचाराचा जोर वाढू लागला असून केलेल्या कामाची पोहचपावती मतदार देतील अशी ग्वाही मतदार देत आहे. पती चरणदास म्हात्रे (विभाग प्रमुख) यांचा दांडगा अनुभव पाठीशी असल्याने दर्शनाताई प्रभागातील अधिकाधिक प्रश्न मार्गी लावण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. यंदा त्यांना निवडणूकित उमेदवार म्हणून पुन्हा संधी मिळाल्याने आपल्या प्रभागातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आदिसारखेच योगदान देईल असे दर्शनाताई यांनी स्पष्ट केले आहे.
प्रभाग २८ मधील पाणी टंचाई, लाईट, रस्ते, गटार यांसारख्या मूलभूत प्रश्नांना कायम स्वरूपी मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिलेल्या दर्शना म्हात्रे यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना बहुतांश प्रमाणात यश आले असल्यामुळे होऊ घातलेल्या ठा.म.पा २०२५-२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मिळणारा मतदारांचा वाढता जनाधार हा रेकॉर्ड ब्रेक करणारा ठरत आहे. आजवर करत आलेली जनतेची सेवा निरंतर पुढे नेतील असा विश्वास मतदारांना आहे. आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत दर्शना म्हात्रे पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासाच्या कसोटीवर उतरल्या आहेत. हा निवडणूक लढा केवळ एका उमेदवाराचा नसून, काम करणाऱ्या नेतृत्वाला साथ देण्याचा असल्याची भावना समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. कारण दर्शना म्हात्रे म्हणजे आश्वासनांची यादी नव्हे, तर पूर्ण झालेल्या कामांची साक्ष असल्याचे चित्र प्रभागात दिसून येत आहे.



