ठाणे 3 अंतर्गत प्रकल्प अधिकारी सौ योगिता जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवा येथे मुख्य सेविका सौ प्रतिभा सातवी मॅडम यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम…
अमित जाधव-संपादक
दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी महिला व बालकल्याण प्रकल्प ठाणे 3 अंतर्गत प्रकल्प अधिकारी सौ योगिता जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवा येथे मुख्य सेविका सौ प्रतिभा सातवी मॅडम यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमास मुख्य सेविका सौ रेखा यादव मॅडम ही उपस्थित होत्या अंगणवाडी सेविकाआणि मदतनिस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सौ प्रतिभा सातवी मॅडम यांचे औक्षण करून केक कापण्यात आला तसेच एक छोटीशी भेट म्हणून साडी हार आणि ओटी भरण करण्यात आले तसेच शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी बऱ्याच अंगणवाडी सेविकांनी एक आठवण म्हणून काही भेटवस्तू ही दिल्या सेविकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि प्रतिभा सातवी यांच्याबरोबर केलेल्या कामाचे अनुभव आणि सुखदुःखाचे क्षण व्यक्त करताना सर्व सेविकांना आणि मदतनीस यांना अश्रू अनावर झाले त्यावेळेस प्रकल्प अधिकारी सौ योगिता जोशी मॅडम आणि मुख्य सेविका सौ रेखा यादव मॅडम यांनाही गहिवरून आले त्यावेळी प्रकल्प अधिकारी सौ योगिता जोशी मॅडम यांनी सौ प्रतिभा जोशी मॅडमचे भरभरून कौतुक केले प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ सेवा याबद्दल आणि त्यांच्याबरोबर एकत्रित केलेल्या कामाबद्दल खूप काही अनुभव सांगून त्यांचं कौतुक केलं तसेच सौ रेखा यादव मॅडमने सौ प्रतिभा सातवी यांच्या बद्दल त्यांचे अनुभव आणि मनोगत व्यक्त केले अशा पद्धतीने कार्यक्रम साजरा करत मुख्य सेविका सौ प्रतिभा सातवी यांना सदैव संपर्कात राहण्याचे आश्वासन देत सेवानिवृत्तीबद्दल निरोप दिला.



