0
2
0
9
7
8
आज दिनांक २३/१०/२०२५ रोजी १२:१४ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार दिवा रेल्वे स्टेशन जवळ, स्टेशन रोड, दिवा. या ठिकाणी रोड लगत असलेल्या कंटेनर केबिन व कचऱ्याला आग लागली होती. सदर घटनास्थळी टोरंट पॉवरचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह, ०१-रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी आग लागलेली कंटेनर कॅबीन सार्वजनिक बांधकाम विभागाची असून, त्या कंटेनर कॅबीन मधील असलेले भंगार साहित्य पूर्णपणे जळाले आहे. लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.
0
2
0
9
7
8



