दिवा भाजप चे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांची माजी मंडळ अद्यक्षावर सडकून टीका…
अमित जाधव - संपादक
दिवा/ठाणे ..भारतीय जनता पार्टी माजी मंडळ अध्यक्ष यांनी ठाकरे च्या शिवसेनेत प्रवेश केला व सगळी कडे वृतपत्रात त्याच माजी मंडळ अध्यक्षांनी बातम्या देऊन दिव्यात भाजप ला खिंडार पाडले हे शीर्षक दिले आहे हे किती हास्यास्पद आहे हे दिव्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.दिव्यातील सर्व पत्रकार बांधवांना देखील मागे टाकून हे महाशय स्वतः लिखित बातम्या देऊन स्वतः आपली पाठ थोपटत आहेत भाजप ला खिंडार म्हणून, आम्हाला असे वाटत हे पक्षात असतानाच एक मोठ खिंडार होते पक्षामध्ये सघटनात्मक काम न करता इतर पदाधिकारी याना मागे टाकून स्वतः पुढे जाणे व पदाचा गैरवापर करून स्वतची झोळी भरण्याचे काम करणे म्हणून पक्षाने पदावरून हटवले असे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी बोलताना स्पष्ट केले.
अध्यक्ष पद असताना भाजप च्या वरिष्ठांची व दिव्यातील जनतेची सहानभुती मिळवायची ही तुमची नौटंकी जनतेसमोर उघडी पडली आहे अध्यक्ष पद जाताच आपण पक्ष बदलला यामुळे दिवावांसियाणा देखील चागलेच कळून चुकले माजी मंडल अध्यक्ष हे पक्षात पदापुरते व स्वतः च्या उद्धारासाठी होते त्या मुळे अशा व्यक्तीला आम्ही भांगराची उपमा देऊन त्याच वेळी फटाके वाजवून व पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला असे