Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

जे.के.सी मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार निर्मूलन समिती च्या मार्गदर्शन सभेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

जे.के.सी मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार निर्मूलन समिती च्या मार्गदर्शन सभेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !!!

उल्हासनगर : जे.के.सी मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार निर्मूलन समिती ची मार्गदर्शन सभा दि.19/06/2022 रोजी उल्हासनगर , आनंद नगर फर्स्ट गेट येथील आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आली होती . मार्गदर्शन सभा मोठ्या उत्साहात व सकारात्मक वातावरणात संपन्न झाली तसेच ह्या सभेत उल्हासनगर शहर कार्यकारिणी व इतर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. सदर कार्यक्रमास सामाजिक क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली व नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी उत्तम प्रकारे मार्गदर्शन ही केले .

उल्हासनगर परिवहन विभागाचे उपनिरीक्षक श्री. जगदीश मोकल यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ दिला व उपस्थितांना बहुमूल्य मार्गदर्शन केले तसेच सामाजिक प्रतिष्ठान चे सचिव श्री. समाधान प्रधान, सल्लागार श्री. दिपक मोरे तसेच ज्येष्ठ समाजसेवक श्री.गौतम ढोके , समाजसेवक श्री. महेंद्र रणपिसे, समाजसेवक श्री. विनोद सोनावणे, श्री. अशोक खवले, श्री. प्रदीप उमाप, श्री.संजय शर्मा, शिक्षक श्री. दिनेश साठे , श्री राजेश चव्हाण , ज्येष्ठ पत्रकार व सा. आनंद वैभव चे संपादक श्री. मधूकर आयरे, वैद्यकीय व्यवसाय सांभाळून पत्रकारितेची आवड जपणारे ज्येष्ठ पत्रकार व भारत न्युज चे संपादक डॉ. साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार व लेखक, दिग्दर्शक, जनहित न्यूज चे संपादक श्री. हरी भाऊ आल्हाट , सामाजिक सेवाभावी वृत्तीने गरजूंना मदत करण्यास सदैव तत्पर असणारे कोल्हापूर चे प्रसिद्ध उद्योगपती श्री. रमेश पाटील हे उपस्थित होते.
मार्गदर्शन सभे दरम्यान 138 गरिब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले, धनदिप बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व जे.के.सी मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार निर्मूलन समिती च्या महाराष्ट्र प्रदेश संघटक सौ. यमुताई अवकाळे ( पाटील ) , जे.के.सी चे सदस्य व अंबरनाथ येथील साईबाबा सेल्स चे संचालक श्री. मुरली पंजाबी व जे.के.सी च्या सदस्य व शिक्षिका अमिता देशमुख यांनी गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारे शालेय साहित्य उपलब्ध करून दिले त्याबद्दल जे.के.सी मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्यामभाऊ जांबोलीकर, राष्ट्रीय सरचिटणीस श्री. दिपक साठे सर व संपूर्ण टिम ने त्यांचे कौतुक करून मनोभावे आभार मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे.के.सी मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री शरद घुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचं योगदान दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे