बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

भायखळ्यात गणेशोत्सवात जाहिरातीतुन डॉ  मयुरी शिंदे यांचाच बोलबाला, अनेक राजकीय पक्ष झाले अवाक..

अमित जाधव-संपादक

भायखळ्यात गणेशोत्सवात जाहिरातीतुन डॉ  मयुरी शिंदे यांचाच बोलबाला, अनेक राजकीय पक्ष झाले अवाक

मुंबई संजय बोर्डे

मुंबई महापालिका निवडणूक आता लवकरच येऊ घातली असून अनेक राजकीय पक्ष आपापले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न विविध मंडळांना जाहिरात आणि बॅनर देऊन करत असतात. त्यातच भायखळा विभागात गेल्या अनेक महिन्यापासून लोकांची जनसेवा करून जनमानसात आपले हक्काचे स्थान निर्माण करणाऱ्या सम्राट  शेअर आणि केअर असोसिशनच्या  संचालिका डॉक्टर मयुरी संतोष शिंदे यांनी भायखळा विभागातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आपल्या संस्थेचे बॅनर, प्रवेशद्वारावर जाहिरात देऊन आपले अस्तित्व निर्माण करून आपला जनसंपर्क वाढवला आहे. भायखळा येथे प्रत्येक नाक्यानाक्यावर अनेक सार्वजनिक मंडळामध्ये त्यांचेच प्रवेशद्वार आणि बॅनर पाहायला मिळत आहेत. डॉ मयुरी शिंदे या डॉक्टर असून त्या सुसंस्कृत महिला आहेत त्यामुळे त्यांना लोकांचे सामाजिक प्रश्न  आणि विशेष करून महिलांचे  प्रश्न काय आहेत याची त्यांना जाणीव आहे. तसेच त्यांनी प्रत्येक बिल्डिंगमध्ये आणि चाळी चाळीत आरोग्य शिबीर घेऊन लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही त्यांना भरघोस मतांनी निवडून देणार असल्याची माहिती स्थानिक महिला आरती कांबळे यांनी दिली.  आम्ही गेल्या वर्षांपासून भायखळा विभागात सामाजिक कार्य करत असून लोकांच्या समस्या घरी जाऊन सोडवतो. त्यातच मी स्वतः डॉक्टर असल्याने मी अनेक नागरिकांवर मोफत उपचार करत असते. तसेच त्यांना मोफत औषधें हि देत असते. भायखळा विभागातील नागरिकांची निवडणुकीला उभे राहण्याची मागणी आहे त्यामुळे येणाऱ्या  महापालिकेची निवडणूक लढवणार असून  यापुढे देखील आम्ही हा समाजसेवेचा वारसा असाच पुढे सुरु ठेवू अशी माहिती डॉ मयुरी संतोष शिंदे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे