बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणकृषिवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

आमदार किसनराव कथोरे यांच्या संकल्पनेतून साकालेलं डाँ.बाबासाहेब आंबडेकर स्मारकाचे लोकार्पन सोहळा पार , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले उद्घाटन…

अमित जाधव-संपादक

आमदार किसनराव कथोरे यांच्या संकल्पनेतून साकालेलं
डाँ.बाबासाहेब आंबडेकर स्मारकाचे लोकार्पन सोहळा पार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले उद्घाटन

बदलापूर (प्रतिनिधी) आमदार किसनराव कथोरे यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सोनिवली,बदलापूर येथील भगवान गौतम बुद्ध मुर्ती प्रतिष्ठापना,बुद्धविहार व भिख्ख्यु निवास इमारतीचे लोकार्पण सोहळा, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्रे फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.

तर भारत रत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातील भव्य पुतळा,सुसज्य ग्रंथालय व वाचनालय इमारतीचे भुमिपूजन खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले,आमदार किसनराव कथोरे, आमदार निरंजन डावखरे, श्री वामन म्हात्रे,राजेंद्र घोरपडे,प्रविण राऊत,शरद तेली,संजय भोईर,संजय गायकवाड,संजय जाधव,आशिष दामले,धनराज गायकवाड,श्रीधर पाटील,संभाजी शिंदे,सुधाकर जाधव,रमेश सोळसे,साकीव गोरे,सुखदेव गायकवाड,दिलीप पवार,महेश जाधव,संगीता चेंदवणकर,प्रणिता कुलकर्णी आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने जनसमुदार उपस्थित होता.कार्यक्रमात विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांचे आ.किसनराव कथोरे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

काल बुद्ध पोर्णिमेचे औचित्य साधून भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सोनिवली बदलापूर यांच्यातर्फे या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. हे स्मारक 4 एकरच्या भुखंडवार विस्तारलेले आहे. आमदार किसनराव कथोरे यांच्या संकल्पनेतून नागरपूरच्या धर्तीवर येथील तथागत गौतम बुद्धांचे दर्शन घेता यावे यासाठी साकारण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे