0
2
0
9
7
4
आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या
मुंबई – आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. मंत्रालयाच्या समोर असणाऱ्या सुनीती येथील शासकीय अपार्टमेंटमधील इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून मुलीने उडी घेतली आहे. ही घटना रात्री 3 च्या सुमारास घडली आहे. 27 वर्षीय तरूणी वकिलीचे शिक्षण घेत होती. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. एका आयएएस अधिकाऱ्याच्य मुलीने आत्महत्या केल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
0
2
0
9
7
4



