Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

जायंट्स ग्रुप ऑफ उल्हासनगर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न……

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*जायंट्स ग्रुप ऑफ उल्हासनगर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न……*
*रक्तदान करुनी बनवा नातं रक्ताचं,*
*वाचवा जीवन रुग्णाचं घडवा दर्शन माणुसकीचं….*
या उक्तीप्रमाणे जायंटस वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक स्वर्गीय नानाजी चुडासामा यांच्या जन्मदिनानिमित्त कल्याण ईस्ट मेडिकल प्रॅक्टिशनर्स सोशल वेल्फेअर अससोसिएशन,साई स्वस्तिक फौंडेशन व जायंटस ग्रुप ऑफ उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्लाझ्मा ब्लड बँक डोंबिवली यांच्या सहकार्याने साई-स्वस्तिक हॉस्पिटल कल्याण येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.छाया घारपुरे यांच्या शुभहस्ते तसेच सचिव डॉ.मुकुंद जाधव,खजिनदार डॉ.महेश गोसावी,जायंटस वेल्फेअर फाउंडेशन वन सी चे उपाध्यक्ष डॉ.प्रा.प्रकाश माळी उल्हासनगर ग्रुपचे अध्यक्ष डॉ.प्रशांत भदाणे,साई स्वस्तिकचे डॉ.तुषार ठेणगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या शिबिरात फेडरेशन वन सी चे अध्यक्ष डॉ.संजय पवार व उल्हासनगर ग्रुपचे सचिव गिरीधर आरोलकर यांनी रक्तदान केले.तसेच उल्हासनगर ग्रुपचे माजी अध्यक्ष डॉ.प्रशांत पवार यांनी भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.शिबीर यशस्वी होण्यासाठी डॉ.सतिश गीते,डॉ.स्वप्निल मुळे,प्लाझ्मा ब्लड बँकेच्या डॉ.शाह मॅडम व स्टाफ तसेच साई-स्वस्तिक हॉस्पिटलचा स्टाफ यांनी विशेष मेहनत घेतली.या शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे