Breaking
ब्रेकिंग

दीवा शहरातील अनधिकृत शाळांवर लवकरच होणार कारवाई,दिव्यातील अनधिकृत शाळेंची यादी लवकरच प्रसिद्ध होणार,बेधडक ठाणे न्यूज करणार पोलखोल…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे जिल्ह्यात ३३ अनधिकृत माध्यमिक शाळा सुरू आहेत. या शाळेच्या संस्थाचालकांनी त्यांच्या संस्थांमार्फत सुरू असलेल्या या अनधिकृत माध्यमिक शाळा-वर्ग तत्काळ बंद करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. ‘शाळा तत्काळ बंद करून तसे हमीपत्र शिक्षण विभाग (माध्य.) जिल्हा परिषद ठाणे या कार्यालयास सादर करावे. अनधिकृत माध्यमिक शाळा-वर्ग तात्काळ बंद न केल्यास संबंधित संस्थाचालकाविरुद्ध शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८(५) व १९ (१) मधील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शेषराव बडे यांनी सांगितले आहे.यात दिव्यातील अनधिकृत शाळा मोठ्या प्रमाणावर असून अनेक वेळा शिक्षण विभाग नोटिसा बजावून देखील राजरोस पने ह्या बेकायदेशीर शाळा मुलांना शैक्षणिक धडे देत आहेत.त्यात मोठ्यप्रमाणावर मुलाचे व पल्यांचे नुकसान होत आहे.नोटीस देऊनही या अनधिकृत शाळा बंद न केल्यास एक लाख दंड वसूल केला जातो. त्यातूनही शाळा सुरू ठेवल्यास प्रतिदिन दहा हजारांचा दंड आकारला जातो. ठाणे जिल्ह्यात २०१७मध्ये १४६, २०१८ ला ४१ तर २०१९ -२० मध्ये ३३ अनधिकृत शाळा तर २०२२ – २३ हा आकडा ५० च्या जाण्याची शक्यता आहे अशा शाळा अनधिकृत असल्याची नोंद आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमांच्या अशा एकूण ३३ अनधिकृत शाळा असून या अनधिकृत माध्यमिक शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये. आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित पालकांची राहील, असे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे