0
2
0
9
7
4
प्रसिध्द कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता झाल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. आता ते दिल्लीत असल्याची माहिती समोर आली. तसेच ते बरे असून लवकरच मुंबईत परतणार आहेत. ते एका शोसाठी बिहारमधील पाटणाला गेले होते. पण ते मुंबईतील घरी परतले नाही, त्यांचा फोनही बंद येत होता. यामुळे घाबरलेल्या पाल यांच्या पत्नीने पोलीसांत तक्रार दाखल केली. सुनील पाल यांचा फोन खराब झाल्याने त्यांना संपर्क करता येत नव्हता.
0
2
0
9
7
4



