ब्रेकिंग
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अंदाजे 48.89 टक्के मतदान..
अमित जाधव - संपादक
ठाणे, दि. 20 (प्रतिनिधि) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरुवात झाली. 23 भिवंडी मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 48.89 टक्के मतदान झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे—-
134 भिवंडी ग्रामीण – 58.00 टक्के
135 शहापूर – 50.99 टक्के
136 भिवंडी पश्चिम – 47.80 टक्के
137 भिवंडी पूर्व – 43.37 टक्के
138 कल्याण पश्चिम –43.00 टक्के
139 मुरबाड – 51.18 टक्के
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.