ब्रेकिंग
बदलापूर अत्याचार प्रकरणात ठाण्याचे जिल्हा शिक्षण अधिकारी बाळासाहेब रक्षे यांना केले निलंबित..
अमित जाधव - संपादक
बदलापूर अत्याचार प्रकरणात ठाण्याचे जिल्हा शिक्षण अधिकारी बाळासाहेब रक्षे यांना निलंबित करण्यात आले आहे. वेळेवर या प्रकरणाची संबंधित यंत्रणांना माहिती न दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तर मुंबईत महापालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकल यांना शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे न लावल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. निष्काळजीपणा करणाऱ्यांना या कारवाईतून कठोर संदेश मिळेल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.