Breaking
ब्रेकिंग

दिव्याजवळील बेतवडे येथे प्रधानमंत्री आवास योजने नागरीकांना ‘परवडणारी घरे’ राबवणार…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे ( ता 14 डिसें ) : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ‘परवडणारी घरे’ ही योजना राबविण्यात येत असून सदरची योजना राबविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेस बेतवडे येथील शासनाचे दोन भूखंड प्राप्त झाले आहेत, या भूखंडावर पी.पी.पी. (Public private participation) या तत्वावर निविदा मागवून विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू.

बेतवडे येथे शासनाकडून प्राप्त झालेल्या दोन्ही भूखंडावर प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ‘परवडणारी घरे’ या शीर्षकाखाली आर्थिक दुर्बल घटकातंर्गत येणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रात सुमारे 1441 लाभार्थी आहेत पैकी 1253 लाभार्थ्यांना परवडणारी घरे अल्पदरात उपलब्ध होणार असून उर्वरित 188 प्रकल्पबाधितांना रुपये दोन लक्ष इतका आर्थिक हिस्सा अदा करुन सदनिका देय राहतील. सदर सदनिका 30 चौ.मी चटईक्षेत्र इतक्या मोजमापाच्या असतील. सदरची कामाची निविदा पी.पी.पी. तत्वावर काढण्यात येणार असून जो निविदाकार 1441 सदनिकांपेक्षा अधिक सदनिका (पाच वर्षाच्या देखभाल व दुरूस्तीसह) त्याचे स्वखर्चाने महापालिकेस बांधून देईल अशा विकासकासाची नियुक्ती करण्यात येईल, यामध्ये सदर विकासकास उर्वरित चटईक्षेत्रामध्ये नियमानुसार सदनिका व गाळे तयार करुन व्यावसायिक विक्री करण्याची मुभा राहिल असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

‘परवडणारी घरे’ या योजनेतंर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांना केंद्रशासनामार्फत प्रति सदनिका रुपये दीड लक्ष तर राज्यशासनामार्फत रुपये 1 लक्ष याप्रमाणे अनुदान प्राप्त होणार आहे.

सदर बैठकीमध्ये क्रिसीलमार्फत सदर योजनेचा सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. या अनुषंगाने संबंधित कामाची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे, विकासक नियुक्त करणे आदी कामे जलदगतीने पूर्ण करुन दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी प्रत्यक्षात या कामास सुरूवात होण्याच्या दृष्टीकोनातून सुनिश्चित नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना ठाणे मनपा आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे