ब्रेकिंग
ठाणे जिल्ह्यातील मलंगगड येथे फ्युनिक्युलर ट्रेन लवकरच होणार सुरु, काम प्रगतीपथावर…
अमित जाधव - संपादक

लवकरच फ्युनिक्युलर ट्रेन सुरु होणार
ठाणे जिल्ह्यातील मलंगगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. मात्र या टेकडीवर जाण्यासाठी तब्बल 2,600 पायऱ्या चढाव्या लागतात. यात पर्यटकांचा 2 तास वेळ जातो. पण शासनाने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मलंगगड टेकडीवर फ्युनिक्युलर ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मागील काही दिवसांपासून या ट्रेनचे बांधकाम सुरु होते. आता लवकरच ही ट्रेन प्रवासाकरिता खुली करण्यात येणार असल्याची माहिती आहे.