बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

माणुसकी हाच सगळ्यांत मोठा धर्म आहे.- समाजसेवक श्री.अजित एकनाथ भगत….

माणुसकी हाच सगळ्यांत मोठा धर्म आहे.- समाजसेवक श्री.अजित एकनाथ भगत.

दिवा विशेष प्रतिनिधी :- विकास जगताप

दिवा शहरातील श्री.अजित एकनाथ भगत साहेब, प्रचंड आत्मविश्वास, श्रद्धावान व्यक्तित्व व सामाजिक जाणीव लाभलेले आदर्श व्यतिमत्व आहेत. समाज बांधणीची विशेष कला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक आगळी झळाळी प्रदान करते.आपल्या आयुष्यात येणाऱ्या काही व्यक्ती अशा असतात की , त्यांचा सहवास नेहमीच प्रेरणादायी व हवाहवासा असतो.त्या सहवासाने आपले आत्मबल वाढवण्यास व नवा उत्साह व नवचैतन्य निर्माण करणारा असतो परंतु त्यांच्या बाबतच्या भावना व्यक्त करतांना कोणत्या प्रकारे करावी हेच कळत नाही.अशी स्थिती आज श्री. अजित भगत साहेब यांच्या विषयी विचार मांडतांना होत आहे. ज्या माणसाने आपल्या शीतल मनमिळाऊ स्वभावाने माणसांचा एक मोठा गोतवळा निर्माण केला आहे त्यांचे मित्रपरिवार हे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आज महाराष्ट्रभर विखुरलेले दिसतात याचे कारण श्री. अजित भगत साहेब हे प्रत्येकाच्या सुख-दुखात सतत सहकार्य व मदतीची तयारी हे त्यांच्या स्वभावाचे खरे वैशिष्ट्य आहे .ते सर्वसामान्य कुटुंबातुन पुढे आलेले असल्यामुळे सामान्य माणसाबाबत श्री. अजित भगत यांच्या मनात नेहमी आदराची व सहकार्याची भावना असल्यामुळे साहेबांच्या कार्यालयात समस्या घेवुन येणारा व्यक्ती समाधानी होवुनच जातो या बाबत अनेक उदाहरणे मी पाहीले आहेत म्हणुन अजित भगत साहेब आज सर्व सामान्याच्या मना-मनात घर करून आहेत.ते स्वतंत्र व स्वयंभू विचाराचे असल्यामुळे व कोणाची ताबेदारी आवडत नसल्यामुळे भ्रस्ट स्वभावाचे लोक त्यांच्या जवळपास सुद्धा येत नाहीत.त्यांनी आयुष्यात खूप त्रास व आपार कष्ट सुद्धा खूप केले. पण आपला शीतल मनमिळाऊ परोपकारी स्वभाव स्वाभिमानी वृत्ती कधीही सोडली नाही.शालेय व महाविद्यालयीन जीवनात साने गुरूजी. स्वामी विवेकानंद व म.गांधींचे विचार व अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन खऱ्या अर्थाने जडण-घडन झाली असे श्री. अजित भगत साहेब म्हणाले तसेच महाविद्यालयीन जीवनात विविध सांस्कृतिक स्पर्धेत वक्तृत्व,नाटकांमध्ये भाग घेतला यातुनच श्री. अजित भगत साहेबांचे व्यक्तिमत्व खुलत गेले व विचारांची बैठक तयार झाली. दिवा विभागातील समस्त जनता मार्गदर्शन लाभल्याचे सांगतात. तसेच तसेच आपल्या मनमिळाऊ शीतल परोपकारी स्वभावामुळे त्याची लोकप्रियता अधिक बहरली एवढेच नव्हेतर त्यांची अंधश्रद्धा,समता,बंधुता, फुले,शाहु,आंबेडकर, साने गुरूजी यांचे विचार जन सामान्यांपर्यन्त आपल्या लेखणी द्वारे पोहचविण्याची धडपड आजही आहे. त्याग,निष्ठा,निस्वार्थी वृत्ती या गुणवैशिष्ट्यामुळे त्यांनी समाजकारनात एक आपले आदर्श असे अस्तीत्व निर्माण केले आहे त्यांचे आज सर्वच पक्षात मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात आहे भाऊंचा स्वभाव मनमिळावु,स्पष्टवक्तेपणा, दूरदृष्टी, जाती,धर्मभेदाला थारा न देणारे , संयमी व सर्वांना बरोबर घेवुन चालणारे या गुणांमुळे ते मित्रपरिवाराला व समाजाला हवेहवेसे वाटतात भाऊंनी संपुर्ण परिसराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे .म्हणूनच
भविष्यात भाऊंनी निश्चित केलेल्या योजना,संकल्प सिध्दीस जावो व त्यांना दिर्घ आयुष्य लाभो
अशा बहुगुणी ,बहुआयामी व्यक्तिमत्वास हार्दिक शुभेच्छा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे