
बारावी बोर्डाच्या निकालानंतर सगळ्यांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे वळल्या होत्या. अखेर सर्व पालकांची अन् दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली. उद्या (13 मे) दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल लागणार आहे. बोर्डाने अधिकृतपणे याची घोषणा केली आहे. दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in, mh-ssc.ac.in या संकेतस्थळांना भेट द्या.