ब्रेकिंग
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शक्ती धाम रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू…
अमित जाधव - संपादक

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने तनिषाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी राज्यात वातावरण तापले आहे आता यातच आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शक्ती धाम रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शांतीदेवी मौर्या यांना डॉक्टरांनी भुलीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांची तब्येत खालावली आणि दुसऱ्या रुग्णालयात हलवताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.