शीळ येथे रात्रीच्या सुमारास दोस्ती इमारती जवळ दोन चार चाकी गाड्या जळून खाक…
अमित जाधव - संपादक
प्रा.आ.व्य. कक्ष: ठा.म.पा.:-आग विझविण्यात आली असून, कोणालाही दुखापत नाही.दिनांक २१/०१/२०२४ रोजी २२:३० वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार *(घटनेची माहिती देणारे:- शीळ अग्निशमन केंद्र)* दोस्ती इमारतीसमोर, शिळफाटा, ठाणे (प.) या ठिकाणी पार्क केलेल्या ०२-चारचाकी वाहनांना आग लागली होती. *सदर घटनास्थळी डायघर पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह उपस्थित होते.*सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
आग लागू नुकसान झालेल्या वाहनांचा तपशील पुढीलप्रमाणे:-
१)* Mahindra Scorpio Car MH 06 AS 4326 *(मालक – श्री. इम्तियाज अहमद)
२)* Hyundai X-Cent MH 43 BG 6223 (मालक – श्री. महम्मद हुसैन)
सदर घटनास्थळी लागलेली आग २३:०० वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांकडून विझविण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.



