दिवा उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांच्या वतीने रिलायन्स टॉवर शाखा भव्य आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबीराचे आयोजन..
अमित जाधव - संपादक
आज 16फेब्रुवारी 2024 रोजी शिवसेना दिवा उपशहर प्रमुख आणि मा.नगरसेवक श्री.शैलेश पाटील, आणि विभागप्रमुख श्री.कैलेश पाटील यांच्यावतीने , विभागांतील नागरीकांच्या वैद्यकीय समस्यांचे मोफत उपचार केले जावेत, या बाबत,भारत सरकार, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबिर आयोजित केले होते.प्रभागातील नागरीकांच्या आग्रहाखातर शिबिर शनिवार , रविवार 17 फेब्रुवारी 2024 पर्यंत सकाळी 11.00ते सायं.06.00 वाजे पर्यंत सुट्टींच्या दिवसांत आयोजित केले आहे. जेणे करून कामगार वर्ग, विद्यार्थी, गृहिणी यांना याचा लाभ घेता येईल. शिबिर यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख श्री. प्रदीप पाटील, श्री. सुरेश जगताप, श्री.मोहीते भरत,श्री. श्री.मनोहर सकपाळ, श्री. जगदीश कदम, श्री.रुपेश लाड, श्री.संतोष तांबे, श्री. एकनाथ जाधव, श्री. राजेंद्र कांबळे,श्री. आशिष सिंग आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.