Breaking
ब्रेकिंग

दिवेकरांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष दालन मा.नगरसेवक शैलेश पाटील यांनी आपल्या कार्यालयातच केलं सुरु…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता २१ जुलै : अनेक विविध आजार किंवा त्यासाठीच्या कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया तसेच अनेक आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य दिले जाते. परंतू समाजातील अनेकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत अर्थसहाय्य मिळण्यास मदत अनेक अडचणी निर्माण होतात त्या तातडीने मदत करणे हा उद्देश या योजनेचा आहे. मात्र ही रक्कम मिळवण्यासाठी नेमकी अर्ज कसा करायचा? त्यासाठी कुठे संपर्क साधायचा? याची माहिती अनेकांना नसते. पण आता एका मिस्ड कॉलवर मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मिळणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत अनेकदा रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाइकांना माहिती नसते.

दिवा शहरातील अनेकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी तात्काळ मा. नगरसेवक शैलेश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात मदत मिळण्यासाठी दालन सुरु करण्यात आले आहे. आता एका मिसकॉलवर हा निधी मिळणे शक्य होणार आहे. यासाठी ८६५०५६७५६७ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता वरील क्रमांकावर मिस्ड कॉलवर देताच तत्काळ मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज आपल्या मोबाईलवर उपलब्ध आहे असे शिवसेना दिवा उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांच्या कार्यालयात मार्गदर्शन मिळणार असून त्यासाठी दिवेकरांना आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही मध्यस्थांच्या अथवा खाजगी संस्थ्ये मार्फत अर्ज करून आर्थिक देवाण घेवाण करू नये असे मा. नगरसेवक पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे