Breaking
ब्रेकिंग

वसई विरार मनपा क्षेत्रात अनाधिकृत बांधकामवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सहायक आयुक्तांना मारहाण…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

वसई विरार मनपा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही बेकायदा बांधकामांना आळा घालण्यात पालिका अपयशी ठरत आहे. त्यामुळे भूमाफियांचे फावले पसलरले आहेत. बुधवारी मनपा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अजित मुठे हे त्यांच्या जमीनदोस्त पथकासह कामण-भिवंडी रोडवरील चिंचोटी, शिल्लोत्तर येथील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेले होते.

कारवाई सुरू असताना बेकायदा बांधकाम करणाऱ्यांनी या कारवाईला विरोध करत पालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पालिकेने बेकायदा बांधकाम पाडण्यास सुरुवात करताच तेथे उपस्थित भूमाफियांनी अजित मुठे व कर्मचारी यांना त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर अजित मुठे आणि त्यांची टीम भूमाफियांवर गुन्हा दाखल करण्यासाठी नायगाव पोलीस ठाण्यात हजर होते
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे