Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

कल्याण मध्ये धक्कादायक प्रकार.भंगार दुकानावर छापा टाकण्यास गेलेल्या पोलिसांनाच कोंडून ठेवले….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

कल्याण मध्ये धक्कादायक प्रकार.भंगार दुकानावर छापा टाकण्यास गेलेल्या पोलिसांनाच कोंडून ठेवले….*

भंगाराच्या दुकानावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना  कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली आहे. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिल्यानंतर महात्मा फुले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली. पोलिसांनी कोंडून ठेवणाऱ्या दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. शौकत शेख आणि इशाद बागवाण अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.  कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरातील एका  गोडावूनमध्ये रेल्वेचे चोरी केलेलं भंगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत.  माहिती मिळताच आज दुपारच्या सुमारास महात्मा फुले पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी भंगार ठेवलेल्या  गोडाऊनमध्ये गेले होते. गोडाऊनमध्ये जाताच त्याठिकाणी असलेल्या शौकत याने शटर बंद करत त्यांना चक्क गोडावूनमध्ये  कोंडून ठेवत बाहेरून कुलूप लावलं.पोलीस कर्मचारी जयेश गोसावी आणि अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तत्काळ महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कोडून ठेवलेल्या या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे