Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सुरेश केसरकर यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*सुरेश केसरकर यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान*…..

दलित सेवा संघटना गोवा यांचे वतीने गेली चोवीस वर्षे संपूर्ण देशभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी (IAS), डॉक्टर्स, इंजीनियर्स, ज्येष्ठ विधितज्ञ, साहित्यीक, वास्तू शिल्पकार तसेच समाजाप्रती निष्ठेने अविरतपणे सर्वच क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

यावर्षी दलित सेवा संघ गोवा यांच्यावतीने २४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजातील सर्वच घटकांप्रती भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा शनिवार दि. १६ / ०४ / २०२२ रोजी मडगाव गोवा येथे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावर्षीचा दलित सेवा संघटना गोवा यांचा, “समाज भूषण पुरस्कार” कोल्हापूरचे सुरेश केसरकर (अध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र) यांना, विधान सभेचे सभापती रमेश कावडकर साहेब यांचे हस्ते व गोव्याचे मा. उप मुख्यमंत्री बाबू कवळेकर साहेब यांचे उपस्थितीत गोवा येथे शानदार सांस्कृतिक कार्यक्रमात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी एक्स कौन्सिलर एम एम सी अविनाश शिरोडकर, संस्थेच्या अध्यक्षा विनिषा तांबोळकर, महासचिव उत्तम रेडकर व इतर राज्यातील प्रतिष्ठित मान्यवर व्यासपिठावरती उपस्थित होते.
यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी व विविध क्षेत्रातील निष्णात मान्यवर अशा देशभरातील १६ मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविणेत आले. यावेळी गोव्यातील प्रतिष्ठीत मान्यवर तसेच पुरस्कार्थीं व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कामी मा. नितीन यादव यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे