गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
किरीट सौमया मंत्री.अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यास हातोडा घेऊन दापोली कडे रवाना….
अमित जाधव-संपादक
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचं रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली इथे असलेलं रिसॉर्ट तोडण्यासाठी म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या निघाले आहेत. शनिवारी (26 मार्च) दुपारी ते दापोलीच्या दिशेने रवाना झाले आहेत.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी दापोली आणि परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, याठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनीही गर्दी केल्याची माहिती मिळाली आहे.
प्रतीकात्मक असा मोठा हातोडा सोमय्या यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना दाखवला. हा हातोडा जनतेच्या भावनांचं प्रतीक असल्याचं सोमय्या म्हणाले.